点评:" सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर" ट्रेकर्सची स्वप्नपुर्ती करणारी संस्था... त्यांचं आयोजन,नियोजन,संयोजन वाखाणण्याजोगे आहे.त्यांच्याकडची प्रस्तरारोहणासाठी लागणारी साहित्य सामुग्री उत्तम दर्जाची आहे. प्रत्येक स्वयंसेवक हा प्रशिक्षीत अतिशय धाडसी उत्साही आणि कष्टाळू सुद्धा.... मोकळं चालताना उभी चढण चढताना माझी दमछाक होत होती... पण हि मंडळी भलं मोठं वजनदार दोराचं भेंडोळं खांद्यावर टाकुन हसतखेळत मार्गक्रमणा करीत होती. शिवाय कॅरीबिनर, डिसेंडर असेंडर अशा जडजड साहित्य घेऊन दोन अडीच तासांची पायपीट झाली... आणि त्या कड्याजवळ पोहोचलो. लगेचच काळजीपुर्वक शास्त्रशुद्ध पद्धतीने सेटअप लावला गेला. गडबड नाही की गोंधळ नाही.. कोणी काय करायचं हे आधीच ठरलेलं होतं. आजूबाजूच्या डोंगरावरून पाणी एकत्र येऊन धबधब्याच्या रुपाने त्या प्रचंड महाकाय कड्यावरून ८०० फुट खोल झेपावत होतं. आणि आपल्याला त्या पाण्याच्या धारे सोबत खाली जायचं होतं. इथं माझी थोडी टरकली होती. पण SRA टिम चा आत्मविश्वास जबरदस्त होता. 'आपण काहीतरी भयंकर साहस करतोय' हे त्यांच्या चेहर्यावरून किंवा देहबोलीतून अजिबात जाणवत नव्हतं. माझे बाकीचे सहकारी हसत खेळत बागडत होते. हे पाहुन माझ्या अंगात एकदम स्फुरण चढलं... आणि मी सर्वप्रथम उतरण्याचा निर्णय घेतला. आणि सुरु झाला थरार...... खाली उतरत असताना काही वेळानंतर माझं आस्त्विव निसर्गाशी पुर्ण एकरूप झालं..... भिती, काळजी, चिंता या मनाच्या अवस्था केव्हाच मागे पडल्या.... तो चित्तथरारक, रोमांचकारी अनुभव शब्दबद्ध करणं अशक्य आहे. हि अनुभवन्याचीच बात आहे. जसं भाकरीचं चित्र बघुन पोट भरत नाही. ती खावी लागते..... अशाप्रकारे हि मोहिम सुरक्षित यशस्वी झाली...याचं सर्व श्रेय सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर चे सर्व कार्यकर्ते तसेच या मोहिमेतील सर्व सहभागी सहकारी यांना जातं...माझ्यासारख्या अनेक ट्रेकर्सची SRA टिमकडुन स्वप्नपुर्ती व्हावी.... हिच सदिच्छा....
翻译:“Sahyadri Rock Adventure”是一个完成徒步者梦想的组织……他们的组织、策划、协调值得称赞。每一个志愿者都非常勇敢,热情,在训练中很努力。。。爬着陡峭的山坡,自由地走着,我累了。。。但是这群人肩上扛着沉重的绳索大羊,微笑着行进。而且背着登山扣、下降器、上升器等沉重的物资,走了两个半小时……才到达那座悬崖。随即,以科学的方式建立了护理。没有大惊小怪或混乱.. 已经决定了要做什么。水从周围的群山汇集,以瀑布的形式从巨大的悬崖上涌出 800 英尺深。我们不得不顺着那股水流下去。我在这里有点困惑。但是 SRA 团队的信心是压倒性的。从他们的脸上或肢体语言中根本看不到“我们正在进行一场可怕的冒险”。其余的同事都在嬉笑。看到这里,我很激动……我决定先下车。兴奋开始了……下降时,一段时间后我的灵魂与自然完全融为一体……这是经验问题。就像看着一张面包的照片填不饱肚子一样。它必须被吃掉......这就是探险成功的方式......所有功劳都归功于 Sahyadri Rock Adventure 的所有工作人员以及参与这次探险的所有伙伴......许多人的梦想成真像我这样来自 SRA 团队的徒步旅行者......善意......